या लेखात आम्ही bhim jayanti status लिहिले आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संपूर्ण देशात धूम धडाक्याने साजरी केली जाते. ही जयंती भारताबाहेर देखील साजरी करतात. बहुजनांसाठी हा दिवस खूप मोठा असतो यानिमित्ताने पूर्ण देशात रॅली देखील काढली जाते. या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सर्व भारतीयांकडे पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत. तुम्हाला जर हे स्टेटस आवडले असतील तर नक्कीच आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा.
1- वाट पाहता बाबा, तुमची वर्ष कधी सरले,
आता तुमच्या जयंतीला फक्त काही दिवस उरले.
2- आमचा श्वास सुद्धा, तुमची देण आहे,
बाबा १४ एप्रिल म्हणजे, आमच्या जगण्याच कारण आहे.
3- डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कळायला वेळ लागतो,
पण एकदा कळले कि, वेड लागते.
4- वर्षातील सर्वात आनंदाचा क्षण म्हणजे बापाची जयंती.
5- स्वाभिमानाने जगायचे असेल तर हक्कासाठी लढावे लागते.
6- झूकून नाही छाती ठोकून बोलणार, हाय हॅलो नाही जय भीम बोलणार.
7- जेव्हा जेव्हा इतिहासात, आंबेडकर नावाची व्याख्या लिहली जाईल तेव्हा तेव्हा त्याचा मुख्य विषय माता रमाई राहील.
8- नमन त्या पराक्रमाला, नमन त्या देश प्रेमाला,
नमन त्या ज्ञान देवतेला, नमन त्या महापुरुषाला,
नमन अशा आपल्या बाबासाहेबांना.
!!!… आंबेडकर जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!!!
9- ज्यांच्यामुळे लाखो घरांचा उद्धार झाला, दीनदुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला, कोटी कोटी अभिवादन त्या महामानवाला, ज्यांनी संविधानरुपी समतेचा अधिकार दिला… !!!…डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा…!!!
10- विश्वरत्न, विश्वभूषण, भारतरत्न, महाविद्वान, महानायक, अर्थशास्त्री, महान इतिहासकार, संविधान निर्मिता, क्रांतीसुर्य, युगपुरुष, परमपूज्य बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा…!!!

11- निळ्या रक्ताची धमक बघ स्वाभिमानाची आग आहे, घाबरू नको कोणाच्या बापाला तू भिमाचा वाघ आहे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा…!!!
12- मोजू तरी कशी उंची तुमच्या कर्तुत्वाची, तुम्ही जगाला शिकवली व्याख्या माणुसकीची, तुम्ही देवही नव्हता, तुम्ही देवदूतही नव्हता, तुम्ही माणसातल्या माणुसकीची पूजा करणारे खरे महामानव होता. !!!…डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा…!!!
13- माझ्या बाबासाहेबांचे काम एवढे मोठे, त्यांचे पुढे वाटतात चंद्र सूर्य हि छोटे. !!!…डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा…!!!
14- माझ्या भिमाने मला डोकं उंच धरून जगायला शिकवल, माझ्या भिमाने शिक्षणाचे महत्त्वही समजावून सांगितलं, माझ्या भिमाने मला अत्याचाराविरुद्ध लढायला शिकवल, आज मी खूप वर आलो आहे माझ्या भिमान मला उंचावर नेल आहे.
15- जगातला असा एकमेव विदयार्थी, ज्यांचा शाळेचा पहिला दिवस,
विदयार्थी दिवस म्हणून साजरा करतात, अशा महान विद्यार्थ्यांची आज जयंती. !!!…डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा…!!!
16- ना तो कुठला राजा होता, ना कधी कुणाचा गुलाम होता,
पण त्याने देशातून अस्पृश्यतेची गुलामगिरी नष्ट केली आणि म्हणूनच तो महामानव ठरला.
17- हवा वेगाने न्हवती हवेपेक्षा त्यांचा वेग होता, अन्याया विरुद्ध लढण्याचा त्यांचा इरादा नेक होता, असा रामजी बाबांचा लेक भीमराव आंबेडकर लाखात नाहीतर जगात एक होता.
18- ज्यांनी झोप हरवून आम्हाला जगवले, अश्रू गाळून आम्हाला हसवले, त्या महापुरुषाला संपूर्ण जग डॉ. भीमराव आंबेडकर म्हणतात हे कधीही विसरू नका.
19- कोणालाही जमणार नाही अशी क्रांती करून दाखवली, जातीयवादयाला देऊन टक्कर चवदार ओंजळ भरून दाखवली, निसर्ग नियमाप्रमाणे पाणी आग विझवते, पण माझ्या भीमाने तर पाण्यालाच आग लावली.
20- फुलांची कहाणी वसंताने लिहिली, रात्रीची कहाणी तार्यांनी लिहिली, आम्ही नाही कोणाचे गुलाम कारण आमच्या आयुष्याची कहाणी बाबासाहेबानी लिहिली.
21- कोणी म्हणतात भीमराव, कोणी म्हणतात बाबा, अशा या महामानवाचा आजही आहे सर्वांवर ताबा.
22-